डिझेल भरण्याससाठी उसने दिलेले पैसे परत मागणे पडले महागात!;वाचा खामगावात काय घडलं?

 

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डिझेल भरण्यासाठी उसने दिलेले पैसे परत मागणे एकाला महागात पडल्याची घटना खामगावच्या सजनपुरी येथे घडली आहे. झाले असे की रमेश सुरेश सपकाळ वय ३१ वर्ष रा - सजनपुरी (खामगाव) याने पवन सुभाष पवार रा - सजनपुरी (खामगाव) याला काही दिवसांपूर्वी त्याच्या गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी ७३० रुपये उसने दिले होते. ते उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी रमेश सपकाळ हा २९ मार्च च्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान पवन पवार च्या घरी गेला होता. तेव्हा पवन पवार याने पैसे सकाळी देतो असे सांगितले. 

तेवढ्यात सपकाळ हा आपल्या घरी परत जात होता. तेव्हा पवन पवार याचा भाचा शिवा प्रमोद पाटील हा तिथे आला त्याने सपकाळ यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली.पवन पवार याने सपकाळ याला पकडून ठेवून शिवा पाटील याने सपकाळ यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जखमी केले. सपकाळ यांच्या तक्रारीवरून व मेडिकल सर्टिफिकेटवरून शिवाजीनगर पोलिसांनी पवन पवार व शिवा पाटील या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास नपोकॉ राठोड करीत आहेत.