तलावत पाय घसरून ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जनुना तलावातील घटना!
Aug 7, 2025, 08:10 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जनुना तलावात पाय घसरून पाण्यात पडल्याने ४२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. मोहन प्रल्हाद पारस्कर रा.वाडी असे मृतक युवकाचे नाव आहे.
परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर काम करण्यासाठी मोहन गेला होता. दरम्यान काम आटोपून हात-पाय धुण्यासाठी तो तलावाजवळ गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो पूर्णतः बुडाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यावरुन शिवाजीनगर पोलीस आणि अग्निशामक दलाने घेऊन घटनास्थळी धाव शोधमोहीम राबवली. काही वेळाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.