तुकोबारायांची विटंबना करणाऱ्या केतकी चितळेविरुद्ध कठोर कारवाई करावी!  राष्ट्रीय ओबीसी महासंघाची खामगावात मागणी

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी केतकी चितळे आणि नितीन भावे यांनी जी भाषा वापरली त्यामुळे जगद्गुरू तुकोबाराय यांची विटंबना झाली आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून खामगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच, अखिल भारतीय छावा संघटना, राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सत्याग्रही संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. केतकी चितळे व नितीन भावे यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अंबलकार,  मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच चे विदर्भ अध्यक्ष रवी महाले, शेतकरी संघटनेचे कैलास फाटे, शिवशंकर लगर, विजय इंगळे, अजय तायडे, किशोर भोसले, देवेंद्र देशमुख, धोंडीराम खंडारे, प्रतिक लोखंडकार, मुकेश गावंडे, रवींद्र इंगळे, नीळकंठ सोनटक्के, नंदकिशोर भारसाकळे, शांताराम पाटेखेडे, सुरज  बेलोकार, योगेश आळशी, पवनराजे डिक्कर, चक्रधर बेलोकार, मनोहर थेटे, श्रीराम खेलदार, जयेश भिसे, तहसीन शहा, सारंगधर मानकर, कासम शहा, अमोल दहीभाते, सदाशिव क्षीरसागर , अर्चना बावस्कर, हरिभाऊ बावस्कर, राहुल मानमोडे, प्रशांत लाहुडकर, राहुल राहणे, मनोहर काकडे, गिरिधारी गव्हाळ, गजानन खरप, विष्णू कदम, सचिन देशमुख , नसीम शहा उपस्थित होते.