सरसंघचालक मोहनजी भागवतांचा जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम! कारण आहे "खास"..
२१ दिवस चालणाऱ्या या वर्गाचे उद्घाटन संघाचे क्षेत्र प्रचारक अतुलजी लिमये यांनी केले. यावेळी वर्गाचे वर्गाधिकारी परमानंद राठोड व वर्ग कार्यवाह राजेंद्र उमाळे यांची उपस्थिती होती. कोरोनामुळे मागील २ वर्षे संघ शिक्षा वर्ग होऊ शकले नव्हते. त्यामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या वर्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
संघाच्या पश्चिम क्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांच्या समावेश होते. या तीन राज्यांतून निवडक १८३ शिक्षार्थी या वर्गात २१ दिवस विविध विषयांचा अभ्यास करणार आहेत. अखिल भारतीय स्तरावरील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिक्षार्थ्यांना होणार आहे.. त्यातही सरसंघचालक तीन दिवस वर्गात मुक्कामी राहून शिक्षार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने जे.व्ही. मेहता नवयुवक विद्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.