अल्पवयीन मुलीला दाखवला अश्लील व्हिडिओ!; ५३ वर्षीय दुकानदाराचा प्रताप

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्री साडेआठला मैत्रिणीकडे जात असलेल्या १७ वर्षीय तरुणीला दुकानदाराने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याची घटना मलकापूरमध्ये १ एप्रिलला घडली. मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी ५३ वर्षीय व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या आईने या प्रकरणात तक्रार दिली असून, ती कुलमखेड भागात राहते. याच भागात राहणारा संजय माधव जवळकर याच्यावर अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप तिने केला आहे. त्‍यांची १७ वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे जात होती. तेव्हा त्‍याने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ लावून दाखवला. मुलीला तो किळसवाणा प्रकार पाहून राग आला.

तिने याचा जाब विचारला असता त्‍याने सारवासारव करत महापुरुषांचा चित्रपट बघत होतो, असे म्‍हणाला. मुलीने हा प्रकार घरी आईला येऊन सांगितला. तिच्या आईने जवळकरविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस निरिक्षक संजय ठाकरे करत आहेत.