भागवत कथाकार व कीर्तनकार हभप रामकृष्ण महाराज ताकोते यांच्या पाचष्टीनिमित्त उद्या संतनगरी शेगावात अभिष्टचिंतन सोहळा!

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राज्यातील वारकरी संप्रदायाचे विस्तारक भागवत कथाकार व कीर्तनकार हभप रामकृष्ण महाराज ताकोते  यांचा अभिष्टचिंतन सोहळा उद्या, २१ ऑक्टोबरला पार पडणार आहे. संतनगरी शेगावतील खामगाव रोडवर असलेल्या श्री.गणेश प्रस्थ मंगल कार्यालयात हा भावस्पर्शी सोहळा पार पडणार आहे.

 दुपारी साडेबाराला होणाऱ्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून  माऊली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरदादा  पाटील यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून हभप संजय महाराज पाचपोर, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाशबुवा जवंजाळ, हभप रामभाऊ बुवा झांबरे हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदायाचे मान्यवर संतमंडळी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

शेगाव तालुक्यातील वारकरी कीर्तनकार व टाळकरी यांच्याकडून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वारकऱ्यांनी व चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हभप सोपान महाराज खोंड, ज्ञानेश्वर बुवा फोकमारे, ज्ञानेश्वर महाराज महाले यांनी केले आहे.