पौर्णिमेच्या रात्री ज्ञानगंगात दिसले १७ बिबट...!

 
 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा ते खामगाव दरम्याच्या विस्तीर्ण टापूत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल १७ बिबट आढळून आले आहे! वन्य जीव विभागासह वन्य प्रेमींच नव्हे तर जिल्ह्यासाठी  ही एक आनंदाची बातमी आहे. 
 यंदा १६ मे रोजी आलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या रात्री   नोंदणी केलेल्या  अभ्यासक, वन्य जीव प्रेमी यांचेसह वाइल्ड लाईफ च्या कर्मचाऱ्यांनी दिमाखात अन  निर्भयपणे विहार करणाऱ्या १७ बिबट्यांना ' ट्रॅप' केले.  याशिवाय २९ अस्वल, १७४ रानडुक्कर, ११५ नीलगाय, ६६ मोर- लांडोर यांचीही नोंद केली. याशिवाय अभयारण्यातील पाणवठ्यानजीकच्या टॉवर वरील निरीक्षक व छुपे कॅमेरे यांनी लांडगे, मसण्या उद, खवल्या, हरीण, काळवीट, चिंकारा, रान मांजर, माकड आदीचीही हजेरी नोंदविली.