वृध्द शेतकऱ्याने शेतातील विहिरीत घेतला गळफास! मोताळा तालुक्यातील घटना

 
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वृध्द शेतकऱ्याने शेतातील विहिरीत कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल, ३० मे रोजी मोताळा तालुक्यातील वडगाव शिवारात ही घटना उघडकीस आली. शाळिग्राम वामन शेळके(७३, रा.वडगाव) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शाळिग्राम शेळके हे सकाळी शेतात जातो असे सांगून घरून निघाले होते. दरम्यान ९ वाजेच्या सुमारास अनिल काशिनाथ शेळके हे विहिरीवर पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीच्या लोखंडी अँगलला शाळिग्राम शेळके गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. शेळके यांनी आत्महत्या का केली असावी याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.