शेगावमध्ये होणार २८ मार्चला ओबीसी अधिकार संमेलन!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसी समाज अधिकार संमेलन २८ मार्चला सकाळी ११ वाजता शेगावमधील गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये हाेणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार हार्दिक पटेल व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. अनिल अंमलकार यांनी पत्रकार परिषदेत केले. देशभरातील ओबीसी समाज आता आक्रमक झाला असून, ओबीसी तरुणांच्या हक्कासाठी संमेलनाचे आयोजन केल्याचे प्रा. अंमलकार यांनी सांगितले. संमेलनाविषयी काही जण संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र संमेलन प्रत्येक ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी आयोजित केले असून, राजकीय जोडे बाहेर ठेवून संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. अंमलकार यांनी केले आहे.