मॅक्सिमो गाडी - टिप्परचा अपघात! खामगाव तालुक्यातील घटना
Dec 2, 2022, 19:34 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव - मेहकर रोडवरील आंबेटाकळी येथील चौफुलीवर आज सकाळी ९ च्या दरम्यान मॅक्सिमो गाडी आणि टिप्पर मध्ये अपघात झाला.
मॅक्सिमो गाडी लाखनवाडा येथून अटाळी च्या दिशेने येत होती. टिप्पर अटाळी कडून आलेगाव कडे जात होते. आंबेटाकळी चौफुलीवर दोन्ही वाहनांचा अपघात झाला. या अपघातात मॅक्सिमो वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही वाहनातील कोणालाही दुखापत नाही.