आमदार आकाश फुंडकरांवर सायबर हॅकर्स ची वाईट नजर! ट्विटर अंकाऊंट केले हॅक; फुंडकर म्हणाले...
Nov 3, 2022, 07:58 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. सायबर गुन्हेगारांची वाईट नजर त्यांच्यावर पडली आहे. स्वतः आ.फुंडकर यांनी प्रसिध्दी पत्रक काढून अंकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.
आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून त्यावरून येणाऱ्या पोस्टचा माझ्याशी काहीही संबंध नाही. त्या खात्यावरून येणाऱ्या पोस्ट कुणीही लाईक करू नये, रीट्विट करू नये असे आवाहनही आ.फुंडकर यांनी केले आहे. अकाउंट हॅक झाल्याचे कळल्यानंतर ट्विटर ने दिलेल्या सूचना व लिंकला फॉलो करून त्यांनी अकाऊंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झाले नाही. दरम्यान याबाबत सायबर पोलिसांत तक्रार करणार असल्याचे फुंडकर यांनी म्हटले आहे.