मलकापूर तालुक्यातील विवरा तिचे गाव, चैताली तिचे नाव ! कुठे दिसली तर सांगा पोलिसांना
Aug 9, 2022, 07:12 IST
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्यात. यामागे कुठली टोळी तर सक्रिय नाही ना यादृष्टीने या घटनांचा तपास व्हावा अशी मागणी आता जोर धरत आहे..दरम्यान मलकापूर तालुक्यातील विवरा येथील १९ वर्षांची तरुण गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय. शोधून शोधून थकलेल्या हतबल आईवडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चैताली बळीराम राणे( १९) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ७ ऑगस्ट पासून ती गायब आहे. संध्याकाळी बाहेर गेलेली चैताली रत्री उशिरापर्यंत परतली नाही. गावात , नातेवाईकांकडे तिचा शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर शोधून शोधून हतबल झालेल्या चैतालीच्या आईवडिलांनी मलकापूरच्या दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाचा तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.