"भूमिअभिलेख'चा कर्मचारी खामगावमध्ये ४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!
पहा व्हिडिओ ः
एका वकिलाला लाचखोर चव्हाणने ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. वकिलाला त्यांच्याकडे आलेल्या पक्षकाराच्या वारसाच्या फेरफारची नोंद करायची होती व क्षेत्रफळ दुरुस्त करायचे होते. त्यासाठी चव्हाण ४ हजार रुपये मागत होता. मात्र वकिलांनी चव्हाणची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार आज सापळा रचून चव्हाणला ४ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत चव्हाणविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, बुलडाण्याचे उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोहेकाँ विलास साखरे,राजू क्षीरसागर, नापोकाँ विनोद लोखंडे, जगदीश पवार, नितीन शेटे यांनी पार पाडली.
कुणी लाच मागत असल्यास...
एखाद्या शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी किंवा त्याच्या वतीने खासगी व्यक्ती लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी ०७२६२-२४२५४८ व टोल फ्री १०६४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.