पाच एकरातील सोयाबीनचे शेत जळून खाक! शेतकऱ्याने लावला डोक्याला हात! शेतकऱ्यांनो सावध व्हा; हे तुमच्यासोबतही घडू शकते.! खामगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार
शिर्ला नेमाने येथील शेतकरी बळीराम किसन चव्हाण यांनी त्यांच्या ५ एकर शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. पीकही चांगले उगवून आले होते. खामगाच्या महाराष्ट्र बीज भांडार या दुकानातून २७ जूनला चव्हाण यांनी टरगा सुपर व पॅराशुट ही तणनाशके २७०० रुपये खर्च करून विकत घेतली होती. चव्हाण यांनी शेतात फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितल्यानंतर त्यांना प्रचंड धक्का बसला. ५ एकर शेतातील संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाली होती.
चव्हाण यांनी औषधाची तपासणी केल्यानंतर औषधाची एक्सापायरी डेट संपल्याचे त्यांच्या ध्यानात आले. दुकानदाराने निष्काळजीपणे शेतकऱ्यांच्या पिकांची पर्वा न करता औषधाची विक्री केल्यानेच हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याप्रकरणाची तक्रार केली आहे. शेतकरी प्रकाश चव्हाण यांना आता दुबार पेरणी करावी लागणार असल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्याला देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.