खामगावमध्ये BSNL गोडावूनला आग; लाखो रुपयांचे नुकसान
पहा व्हिडिओ ः
खामगाव- नांदुरा रोडवरील या गोडावूनमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर एकच धावपळ उडाली. नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र गोडावूनमध्ये केबल, जनरेटर तसेच काही भंगार साहित्य असल्याने आग वाढतच गेली. अग्निशामक दलाच्या ३ गाड्यांनी प्रयत्न केल्यानंतर साडेदहापर्यंत आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत बीएसएनएल केबलचे काही गठ्ठे जळून खाक झाले होते तर एका जनरेटरचा स्फोट झाला होता. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. तहसीलदार आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असून पंचनाम्यानंतर नेमके किती नुकसान झाले हे समोर येणार आहे.