बीएसएफचे जवान श्रीकांत सातव यांच्यावर आज खामगाव तालुक्यातील मुळ गावी होणार अंत्यसंस्कार!
Jun 1, 2022, 06:34 IST
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील बिएसएफचे जवान श्रीकांत सातव यांचा २९ मे रोजी कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता. आज, १ जून रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पश्चिम बंगाल मध्ये कर्तव्यावर असताना सातव यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सेवानिवृत्त होत असताना त्यांनी एका वर्षाचा अवधी वाढवून घेतला होता. काही महिन्यांत ते रिटायर होणार होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज १ जून रोजी सकाळी त्यांचे पार्थिव मुळ गावी पिंपळगाव राजा येथे पोहचणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान जवान सातव यांना सलामी देणार आहेत.