BREAKING! वान प्रकल्पाचेही उघडले दोन दरवाजे!! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Aug 5, 2022, 19:27 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा पाठोपाठ संग्रामपूर तालुकतील व बुलडाणा - अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील वान प्रकल्पाचे दोन दरवाजे आज 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उघडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या दोन्ही तीरावरील गावांना अलर्ट करण्यात आले आहे.
आज सायंकाळी साडेचार वाजता धरणाची जल पातळी 406 . 81 मीटर इतकी होऊन 73 टक्के जलसाठा झाला. यामुळे संध्याकाळी 5 वाजता प्रकल्पाचे २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० सेमी उंचीने उघडण्यात आली. सध्या नदीपात्रात २८.८६ घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जलसंपदा च्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.