BIG BREAKING!  जिल्ह्यातील "या" धरण क्षेत्रात रेड अलर्ट! "या" गावांच्या हजारो नागरिकांना धोका!

 
बुलडाणा( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत समाविष्ठ व निर्माणाधिन संग्रामपूर तालुक्यातील  चौंढी  धरण  बुडीत क्षेत्रातील  सर्व  गावांतील राहिवासीयांना अलर्ट करण्यात आले आहे! याचे कारण  अंतिम टप्प्यात असलेला  हा प्रकल्प  यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरण्याची दाट शक्यता आहे. ...

लघु पाटबंधारे विभाग अंतर्गतच्या या चौंढी बृ. लघु पाटबंधारे प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला आहे. सध्या याचे काम अंतिम टप्प्यात असून चालू पावसाळ्यात प्रकल्पात पूर्ण जलसंचय पातळीपर्यंत जलसाठा निर्माण होणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी  किमान दोनदा जाहीर सूचना  लावण्यात आली.

धरण क्षेत्रातील चौंढी, रुधाना, वकाना व भिलखेड बुडीत क्षेत्रातील हजारो  शेतकरी व  ग्रामस्थांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच  ग्रामस्थांनी , पूर्ण संचय पातळी मधील आप आपली घरे, झोपड्या, गोठे, विद्युत मोटर व लाईन , अस्थायी मालमत्ता काढून घेण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले आहे. प्रकल्पाच्या पाण्यामुळे मालमत्ता नुकसान आणि जीवितहानी, वित्तहानी झाल्यास पाटबंधारे विभाग जवाबदार राहणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.