दुदैवी! पावसापासून बचाव करण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यासोबत वाईट घडल! मलकापूर तालुक्यातील घटना

 
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. काल, मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथे  दुपारी ही घटना घडली.

पुंजाजी मोतीराम कहाते (६४) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते हरसोडा शिवारातील शेतात कामासाठी गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. या पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेतातील बांधावर असलेल्या झाडाखाली थांबले. यावेळी त्या झाडावरच वीज पडल्याने कहाते यांचा मृत्यू झाला.
  
गावकऱ्यांनी त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कहाते यांच्या पश्चात दोन मुले,मुली, सूना ,नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान विजा चमकत असताना झाडाखाली बसू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.