खामगावात अतिक्रमण करणाऱ्यांना अद्दल! १३ दुकानांवर चालला बुलडोजर!
Updated: Dec 2, 2022, 21:27 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव शहरात रोडच्या हद्दीत अतिक्रमण करून बांधलेल्या अतिक्रमीत, दुकानांवर आज २ डिसेंबर सकाळी बुलडोजर चालविण्यात आला. केडीया टर्निंग रोड वरील १३ अतिक्रमीत दुकाने सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी लावून जमिनदोस्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या धडक कारवाईने शहरातील अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या टिळक पुतळा ते केडीया टर्निंग या रस्त्याचे काम सुरु आहे. या रोडच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमीत दुकानधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिल्या होत्या. मात्र त्या विरोधात अतिक्रमणधारक न्यायालयात गेले होते. अखेर न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी लावून पोलीस कॉर्टरजवळील १३ अतिक्रमीत दुकाने पाडून जमीनदोस्त केली आहेत. पोलिस संरक्षणात ही कारवाई करण्यात आली आहे.