ASP श्रवण दत्त यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!; सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी... गाण्यावर धरला ठेका!!
पहा व्हिडिओ ः
श्रवण दत्त हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली घाटाखालील जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ते पार पाडत आहेत. दरम्यान, धुळवडीच्या दिवशी त्यांचे कधी न बघितलेले रूप पोलीस कर्मचाऱ्यांना पहायला मिळाले.
आयपीएस अधिकाऱ्यांचा डान्स पाहून सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढला. अगदी लग्नात नाचतात तसा वऱ्हाडी ठेका श्रवण दत्त यांनी धरला. सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी...या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांच्यासोबत या व्हिडिओत खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोली कोळी व इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा दिसत आहेत.