पहिल्याच बैठकीत ५५० प्रकरणे मार्गी!; मोताळ्यात संजय गांधी निराधार योजनेची बैठक

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत काल, १ फेब्रुवारीला ५५० लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली. समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ यांच्या उपस्थितीत मोताळा तहसील कार्यालयात बैठक झाली.

संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांला प्रति महिना १ हजार रुपये अनुदान दिले जाते. मागील ६ ते ७ वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे या बैठकीत मार्गी लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर ओंकार वाघ यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रत्येक निराधार कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे यावेळी वाघ म्‍हणाले.

बैठकीला समितीच्या सचिव तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदार श्रीमती गौर, पंचायत समिती गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी श्रीमती वाघ, श्रीमती नाईक, समितीचे सदस्य प्रवीण निमकरडे, सौ. पूनम भावसार, श्रीकृष्ण खराटे, सचिन हिरोळे, रामदास सपकाळ, गणेश फालक, दिनेश भिडे, प्रकाश पांडे, अब्दुला पठाण, तेजराव जाधव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.