गोठ्याला आग लागून ३ लाखांचे नुकसान! मोरगाव डिग्रस शिवारातील घटना
 

 

जलंब( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शॉर्टसर्किटमुळे शेतात : असलेल्या गोठ्याला व टिनशेडला आग लागून ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मोरगाव डिग्रस शिवारात घडली.

येथून जवळच असलेल्या निंबी येथील रहिवासी शेतकरी संजय विजय बाजारे यांच्या मोरगाव शिवारात असलेल्या शेतातील गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत गोठ्यामध्ये ठेवण्यात आलेले ठिबक, स्प्रिंकलर, पाईप, गहू, कडबा, कुटार, शेतीचे अवजारे व साहित्य जळून खाक झाले. यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.