बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात १२ डिजे जमा; भीमजयंतीच्या मिरवणूकीत नियमांचे उल्लघंन केल्याचा ठपका !
Apr 15, 2022, 14:45 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात काल,१४ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत नियमांचे उल्लघंन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी १२ डिजे शहर पोलीस ठाण्यात जमा केले आले आहेत.
काल सायंकाळी जयस्थंभ चौकातून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली होती. मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आले होते. दरम्यान मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या डिजेनीं नियमांचे पालन केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. ठराविक डेसिबल पेक्षा जास्त आवाज तसेच आरटीओ कार्यालयाची परवानगी न घेता डिजे मॉडीफाय केल्यामुळे डिजे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून डिजे मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी ही कारवाई केली केली आहे.