Chanderi सोनाक्षीचा लग्नात का नव्हता तिचा भाऊ? अखेर त्यानच सांगितलं....
Jul 6, 2024, 08:36 IST
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा विवाह २३ जून रोजी संपन्न झाला. जवळचे मित्र आणि कुटुंब यांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. या लग्नाची माध्यमांत देखील जोरदार चर्चा झाली. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा या विवाहाला विरोध असल्याची चर्चा होती. मात्र ते स्वतः लग्नात उपस्थित असल्याचे दिसले. मात्र सोनाक्षी सिन्हाचा मोठा लव सिन्हा या लग्नात उपस्थित नव्हता.
बहिणीच्या लग्नात भाऊ नसल्याने चर्चा तर होणारच. सोनाक्षीने केलेल्या या लग्नाला भावाचा विरोध असल्याचे बोलले जात होते. लग्नात भाऊ म्हणून जी कर्तव्ये पार पाडायची असतात ती सोनाक्षीचा मित्र साकीब सलीम याने पूर्ण केली.
अखेर आता लव सिन्हा याने त्याचे मौन तोडले आहे. लव सिन्हाने इंस्टाग्राम वर याबद्दल लिहिले आहे.आपल्याला आपले कुटुंब सर्वप्रथम आहे असे त्याने लिहिले. मात्र आता लव सिन्हा याच्या या विधानाचा देखील वेगळा अर्थ घेतला जात आहे. सोनाक्षीने जहीर इक्बाल सोबत लग्न करतांना कुटुंबियांना विश्वासात घेतले नाही असा त्याचा अर्थ घेतला जात आहे, अर्थात यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील सोनाक्षी च्या लग्नाच्या काही दिवस आधी आपल्याला त्याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले होते.
दरम्यान लव सिन्हा म्हणाला की माझ्यासाठी कुटुंब सर्व काही आहे. माझ्याबद्दल खूप काही बोलल्या गेलं..मात्र यामुळे तथ्य बदलणार नाही. म्हणून मी सगळ्यात न पडण्याचा निर्णय घेतल्याचे लव सिन्हा म्हणाला.