श्रद्धा आर्या कोरोनातून बरी होऊन शूटिंगवर परतली...

 
कोरोना विषाणूच्या आधीच्या दोन्ही लाटांनी अनेकांना आपल्या कवेत घेतले. मुख्यमंत्री- आमदार, बॉलिवूड स्टार सर्वांना कोरोनाने बाधले होते. तिसऱ्या लाटेत टिव्ही मालिका कुंडली भाग्यची कलाकार श्रद्धा आर्या हिला सुद्धा कोरोना झाला होता. कोरोनातून बरी होऊन श्रद्धा आता पुन्हा शूटिंगसाठी  परतली आहे.
श्रद्धा आर्याने एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना कोरोनातून बरे झाल्याची बातमी दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अखेर निगेटिव्ह येऊन कामावर परतले आहे, असे कॅप्शन तिने व्हिडिओला दिले आहे. श्रद्धा आर्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.