साराला हवाय घरजावई नवरा!
Dec 5, 2021, 12:51 IST
अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी अमृताची लेक अभिनेत्री सारा अली खान स्वतःच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली आहे. तिला नवरा हवाय तो घरजावई. जो व्यक्ती तिच्या आणि तिच्या आईसोबत कायम राहू शकेल, त्याच्यासोबतच सारा लग्न करणार आहे, असे तिने सांगितले.
साराचे तिच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे सासरी जाण्याची तिची इच्छा नाही. उलट नवराच माहेरी घेऊन येण्याचा तिचा बेत आहे. सैफ अली खानसोबत फारकत घेतल्यानंतर अमृताने एकटीने साराचा सांभाळ केला. तिची काळजी घेतली. त्यामुळे सारा तिच्या आईच्या खूप जवळ आहे. साराचा नवा चित्रपट अतरंगी रे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तिने अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सोबत काम केले आहे. चित्रपटाचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, चित्रपटाच्या प्रसिद्धीत ती सध्या व्यस्त आहे. एका मुलाखतीत साराने भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या.