आलिया भट्टविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश; हे आहे कारण...

 
मुंबई : करण जोहरने नुकतीच एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. पार्टीत करिना आणि करिश्मा कपूरला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सहभागी असलेल्या इतरांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला होता. मात्र अालियाने नियमांचे उल्लंघन करून दिल्लीतील गुरुद्वाराला भेट दिली. होम क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीने दिले आहेत.
आलिया भट्ट नियमांचे उल्लंघन करून दिल्लीला गेली. दिल्लीतील फोटोदेखील तिने सोशल मीडियावर टाकले. ती एक सेलिब्रिटी असून लोक तिला फॉलो करतात हे तिला कळायला पाहिजे होते. आता तिला धडा शिकविण्याची गरज आहे. जबाबदार नागरिक म्हणून आलियाने नियमाचे उल्लंघन करायला नको होते, असे महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष राजू पटेल म्हणाले.