Chanderi दुरावा सहन होईना...! वेस्ट इंडिज वरून भारतात आला अन् लगेच लंडनला गेला विराट...
Updated: Jul 6, 2024, 09:21 IST
यंदाच्या टी -20 वर्ल्ड कप मध्ये फायनलच्या आधीच्या सामन्यांत विराटची धावांसाठी तडफडत होती. ऐन मोक्याच्या क्षणी संघाला जेव्हा गरज होती अशा अंतिम सामन्यात विराट ची बॅट तलवारी सारखी चालली. संघ संकटात असताना विराटने ७६ धावांची खेळी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे अटीतटीच्या सामन्यात भारताला विश्वविजेता होत आले.दरम्यान भारतीय संघाचे भारतात जल्लोषात स्वागत झाले. आधी दिल्लीत भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुंबईत देखील भारतीय संघाची विजयी यात्रा निघाली. दरम्यान या सेलिब्रेशन नंतर विराट कोहली तातडीने लंडनला रवाना झाला..
भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा बहुतांश खेळाडूंचे कुटुंब मैदानात हजर होते. चालू आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत होते. मात्र नेहमी विराट साठी मैदानात उपस्थित राहणारी अनुष्का यावेळी तिथे नव्हती. त्यामुळे विराट व्हिडिओ कॉल द्वारे अनुष्का सोबत सेलिब्रेशन करीत असल्याचे कॅमेरात कैद झाले.
मुंबईत आल्यानंतर देखील भारतीय संघाचे दमदार स्वागत झाले. मरीन ड्राईव्ह वर निघालेली विजय यात्रा दिमाखदार अशीच होती. यावेळी देखील विराट कोहली व्हिडिओ कॉल द्वारे अनुष्काला विजय यात्रा दाखवत होता. विजय यात्रेनंतर वानखेडे स्टेडियमवर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले.
अनुष्का पासून दूर असलेल्या विराटला आता हा दुरावा सहन झाला नाही. त्यामुळे वानखेडे स्टेडियम वरील सेलिब्रेशन आटोपल्यावर विराट कोहली लगेच लंडनला रवाना झाला. आता विराट लंडनमध्ये अनुष्का सोबत वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा करणार आहे.
वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ वेस्टइंडीज मध्ये चक्रीवादळामुळे अडकला होता. त्यामुळे भारतीय संघाला हॉटेल मधून बाहेर पडण्यास सुद्धा मनाई करण्यात आली होती. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा भारतीय संघाला भारतात पोहोचण्यासाठी उशीर लागला. यावेळी चक्रीवादळाची भीषणता विराट कोहलीने व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून अनुष्काला दाखवल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.