त्याने शरीरसंबंधाची मागणी केली...
नंदिता पाटकरची बॉडी डबल म्हणून ती या मालिकेत काम करत आहे. स्वातीने सांगितले, की प्रोडक्शन कंट्रोलरने मला मोबाइल नंबर मागितला होता. पुण्यातून काम करू शकशील का, असे त्याने विचारले. त्यावर मी कुठूनही काम करू शकते, असे सांगितले. त्यानंतर तो म्हणाला, की मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे. मला वाटले तो कमिशनची गोष्ट करत असेल. त्यामुळे मी त्याला सांगितले, की कमिशन देईल... त्यावर त्याने नकार दिला व म्हणाला, की मला आणखी काहीतरी हवे आहे.
तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याला माझ्याकडून नक्की काय हवे आहे. मला त्याची ही मागणी आवडली नाही. त्याला मी तिथेच सुनावले, असे स्वाती म्हणाली. हा प्रकार धक्कादायक असल्याने मी सरळ गोरेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली, असेही तिने सांगितले. तिच्या तक्रारीवर पोलिसांनी प्रोडक्शन कंट्रोलरला अटकही केली. स्वाती आजवर फुलाला सुगंध मातीचा, जिजामाता यासह अनेक मालिकांत काम केले आहे. मात्र कास्टिंग काऊचचा अनुभव पहिल्यांदाच आल्याचे ती म्हणाली. क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेतही स्वाती दिसली होती. स्वातीच्या आरोपामुळे मराठी कलाक्षेत्रात खळबळ उडाली आहे.