एली एवरामचे हॉट फोटोशूट; जीन्सचे बटन उघडे ठेवून...

 
अभिनेत्री एली एवरामने आतापर्यंत बोटावर मोजण्या इतक्या सिनेमांत काम केले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून तिला फारशी ओळख मिळू शकली नाही. सोशल मीडियावर मात्र तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय. इंस्टाग्राम खात्यावर ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, त्या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्सचा वर्षाव होत आहे.

बटन उघडे असलेली जीन्स, स्पोर्ट ब्रा, डोक्यावर टॉवेल आणि हातात एक चहाचा कप अशा अवतारात तिने हॉट फोटोशूट केले आहे. अंघोळीनंतर तिने लगेच फोटोशूट केले असावे असा तिच्या चाहत्यांच्या अंदाज आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २०१३ मध्ये एलीने मिक्की वायरस या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले होते. त्यानंतर उंगली, किसको प्यार करू, वन नाईट स्टँड या सिनेमांत काम केले आहे. काही सिनेमांत तिने आयटम साँग सुद्धा केले आहे.