कॅटरिनासाठी २०२२ लई बिझी इयर!; लग्नानंतर कामेच कामे!!
Jan 1, 2022, 10:57 IST
मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफचा विवाह देशभरात गाजला. लग्नानंतर आता कतरिनाने पुढील वर्षाचे नियोजन केले आहे. २०२१ हे वर्ष कतरिनासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा प्रचंड यश मिळवून देणारे ठरले. आता २०२२ हे वर्ष तिच्यासाठी बिझी असणार आहे. पुढील वर्षभरात अनेक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कतरिना व्यस्त राहणार आहे.
मेरी क्रिसमस हा श्रीराम राघव दिग्दर्शित सिनेमा कतरिनासाठी महत्त्वाचा राहणार आहे. विजय सेतुपुती या अभिनेत्यासोबत कतरिना या सिनेमात झळकणार आहे. त्यानंतर दिग्दर्शक गुरमित सिंह यांचा फोन बूथ हा सिनेमासुद्धा २०२२ मध्ये येणार आहे. या विनोदी सिनेमात सिद्धांत चतुर्वेदीसोबत कतरिना स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यानंतर सलमान खानसोबत टायगर ३ या सिनेमात कतरिना झळकणार असून, सिनेमाचे शूटिंग सध्या सुरू आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर जी ले जरा या फरहान अख्तरच्या सिनेमात कतरिना प्रियांका चोप्रा आणि अालिया भट्टसोबत दिसणार आहे.