तुम्हाला माहितेय कंगणाला कसा हवाय जोडीदार..?

 
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या चित्रपटांपेक्षा वक्तव्यामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच २३ मार्चला तिने तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. कंगना आतापर्यंत अनेकदा तिच्या अफेअर्समुळे चर्चेत आली आहे. मात्र बॉलिवूडची ही सुपरस्टार अभिनेत्री  लग्न करणार तरी कधी? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. कंगनाने तिच्या लग्नावर भाष्य केले नाही. पण तिच्या लाईफ पार्टनरमध्ये कोणते गुण असावेत, हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

कंगनाला सैन्याचे आकर्षण असल्याचे ती सांगते. त्यामुळे तिला लष्करातील अधिकारी जास्त आवडतात. आर्मी ऑफिसर तिचा जीवनसाथी म्हणून बघायला आवडेल, असे तिने सांगितले आहे. हल्ली मुलींना सैनिकांशी लग्न करायला आवडत नाही, असे एका जवानाने तिला सांगितल्यावर केवळ एखादी मूर्ख मुलगीच सैन्यातील जवानाला नाकारू शकते, असे कंगना म्हणाली.

मला गणवेशातील सैनिकांचे खूप आकर्षण वाटते, असेही ती म्‍हणाली. कंगनाचे आजोबा निवृत्त कर्नल आहेत. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास कंगना आता धाकड या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती तेजस या चित्रपटातही काम करत असून, यामध्ये ती एअरफोर्स फायटर भूमिकेत दिसणार आहे. कंगना सध्या एमएक्स प्लेयरच्या रिॲलिटी  शो लॉक अपमध्ये  व्यस्त आहे.