Chanderi News : प्रियांका म्हणाली, लग्नानंतर मी निकसाठी अनेक रात्री जागून काढल्या, कारण...
Feb 1, 2022, 15:47 IST
बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये सुद्धा आपल्या विशेष अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखलं जातं. प्रियांका कधी तिच्या वक्तव्यामुळे तर कधी राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. प्रियांका आणि तिचा पती निक जोनस दोघे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई- वडील झाल्याची बातमी दिली होती. मात्र लग्नानंतर प्रियांकाने अनेक रात्री जागून काढल्या आहेत, असे खुद्द एका मुलाखतीत प्रियांकानेच सांगितलंय. तिनं असं करण्याचं कारणही तसेच आहे.
प्रियांका आणि निकचा प्रेमविवाह झाला आहे. प्रियांकाने सांगितले, की लग्नानंतर रात्री अनेक तास मला झोपच येत नव्हती. कारण निकला मधुमेहाचा त्रास आहे. त्याला हा त्रास फार वर्षांपासून आहे. त्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अनेकदा त्याची शुगर चेक करण्यासाठी तो रात्री उठायचा. तो फार संवेदनशील आहे .त्याची शुगर ठीक आहे का? वाढली की कमी झाली, हे पाहण्यासाठी त्याला वारंवार उठावे लागत होते. त्यामुळे लग्नानंतर मी त्याची शुगर चेक करत होते. त्यामुळे मला अनेक रात्री त्याच्यासाठी जागून काढाव्या लागल्या, असे प्रियांका म्हणाली. प्रियांका तिची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या. मात्र प्रियांकासारखी मुलगी मिळणे खूप अवघड आहे, असे निकने एका मुलाखतीत म्हटले होते.