आलियाच ठरलं..! "या" महिन्यात देणार बाळाला जन्म! हॉस्पिटलचे बुकिंग सुद्धा करून ठेवले..!
Aug 8, 2022, 09:16 IST
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बॉलिवूडची डार्लिंग गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री आलिया भट्ट नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असतेच..लग्न होऊन काही महिने होत नाहीत तोच तिने गुड न्यूज देखील दिली आहे..मात्र सध्या ती गरोदर असली तरी तिच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.
दरम्यान लवकरच आलिया आणि रणबीर कपूर च्या घरी आता नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. साधारणः डिसेंबर महिन्यात आलिया आणि रणबीरच्या बाळाचा जन्म होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या येणाऱ्या बाळाची आणि बाळाच्या आईची रणबीर चांगलीच काळजी घेतांना दिसतोय. आलियाच्या प्रसुतीसाठी रणबीर ने आधीपासून हॉस्पिटल बुक करून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र हे हॉस्पिटल कोणते आहे याची भनक अजूनपर्यंत तरी कुणाला लागली नाही.
तुला मुलगा हवा की मुलगी असा प्रश्न नुकताच एका मुलाखतीत आलियाला विचारण्यात आला होता. त्यावेळी होणारे बाळ स्वस्थ असावे असे उत्तर आलियाने दिले होते. दरम्यान आलियाच्या कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ८ सप्टेंबरला तिचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तिचा नवरा रणबीर कपूर सुद्धा असणार आहे.