INFO : अशा प्रकारच्या बेंबीच्या महिला असतात चिडचिड्या!; त्यांना चटकन येतो राग!
शीर्षक वाचूनच दचकला असाल… पण ज्योतिषशास्त्रानुसार हे खरं आहे. बेंबीचा आकार व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू स्पष्ट करतात. त्यातून स्वभावदोषही समोर येतात. खरं वाटत नाही? तुम्हीच अनुभवून पहा…
मोठी खोल बेंबी ः अनेकांच्या बेंबीचा आकार खोल अन् गोल असतो. असे लोक उदारमनाचे असतात. प्रत्येक गोष्ट ते यशस्वी करून दाखवतात. समजूतदारपणा अशा लोकांमध्ये खूप असतो. ते सहनशीलही असतात. खोल आणि मोठी बेंबीच्या व्यक्तींचा स्वभाव सरळ असतो. आडपडदा न ठेवता अशा व्यक्ती बोलतात आणि त्यांचं मार्गदर्शन इतरांसाठी मार्गदर्शकही ठरतं.
उभी बेंबी ः काही लोकांची बेंबी पातळ, उभट असते. यामुळे बेंबी आहे की नाही असा प्रश्न कधी कधी पडतो. अशा प्रकारच्या बेंबीला प्रश्नचिन्ह आकारातील बेंबी म्हणतात. ज्यांची अशी बेंबी आहे ते लोक अत्यंत आळशी असतात. कोणतेही काम सोपवले की त्यांचा आळस समोर येतो. त्यांच्या ऊर्जा कमी असते. मात्र त्यांना आवडणारे ते काम कौशल्याने करतात हेही खास. स्वत:हून करता येईल अशी कामे ते यांत्रिकी कामांपेक्षा चांगल्या पद्धतीने करतात.
आडवी बेंबी ः काहींची बेंबी धनुष्याकृती आकाराची असते. तिचा आकार ना धड आडवा ना धड अंडाकृती… मात्र या व्यक्ती कर्तृत्ववान असतात. जे काय मिळवायचं ते स्वतःच्या हिमतीवर, असा त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे अशा व्यक्ती चौरचौघांत उठून दिसतात. परिस्थिती कोणतीही आणि कशीही असो ते हार मानत नाहीत. धाडसाने, जिद्दीने सामना करतात. त्यामुळे अशा व्यक्ती हुशार सिद्ध होतात. या व्यक्ती सहजासहजी कुणावर विश्वास ठेवत नाहीत.
अंडाकृती बेंबी ः सहनशील अशा स्वभावाच्या व्यक्ती अंडाकृती बेंबी असलेल्या असतात. चूक झाली ते दुसऱ्यांना सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मनातल्या मनात त्या गोष्टीची सल ठेवतात. असे लोक खूप विचारी असतात. अनेकदा याच जास्त विचार करण्यामुळे त्यांचीही संधीही हुकून जाते. त्यांना नाविण्याचं नेहमी कौतुक असतात. ते सतत नवनवीन गोष्टींबद्दल जाणून घेऊ इच्छितात. नवीन असलेल्या कोणत्याही गोष्टींत चांगले रमतातही.
उथळ नाभी ः उथळ नाभी विशेषतः महिलांची असते. अशी बेंबी ज्या महिलांची आहे त्या चिडचिड्या असतात. लहान आकारापेक्षाही ही बेंबी फारच उथळ असते व आतला भाग पटकन दिसतो. अशा बेंबीच्या महिलांना चटकन राग येत असल्याने अनेकदा लोक त्यांच्यापासून दूरच राहतात. त्या आपल्या कामात निपुनही नसतात. कोणतेही काम घिसडघाईने करण्याची त्यांची सवय असते. त्यामुळे त्यांची कामे अनेकदा अयशस्वी ठरतात. होत नाही. याउलट पुरुषांचे आहे. ज्या पुरुषांची अशी बेंबी असते ते बुद्धिवान, कुशल असतात. ते आपलं कोणतंही नातं मनापासून जपतात.