Info : या ७ वाईट सवयी सोडा अन्यथा किडनीला धोका झालाच म्‍हणून समजा…

किडनी हा माणसाच्या शरीररचनेचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातून टॉक्सिन आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करत असते. शरीरातील ॲसिड बाहेर काढून मीठ, पाणी आणि मिनरल्सचे संतुलन ठेवण्याचे महत्त्वाचे काम किडनी पार पाडते. मात्र आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो. या सवयी लवकर बदलल्या नाहीत तर किडनी डॅमेज होण्याचा धोका वाढतो. या …
 

किडनी हा माणसाच्या शरीररचनेचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातून टॉक्सिन आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करत असते. शरीरातील ॲसिड बाहेर काढून मीठ, पाणी आणि मिनरल्सचे संतुलन ठेवण्याचे महत्त्वाचे काम किडनी पार पाडते. मात्र आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे किडनीवर विपरीत परिणाम होतो. या सवयी लवकर बदलल्या नाहीत तर किडनी डॅमेज होण्याचा धोका वाढतो.

या ७ सवयी बदला…

  • हात- पाय दुखणे, डोके दुखणे यासाठी आपण सर्रास पेनकिलर्स या औषधाचा उपयोग करतो. त्यासाठी आपल्याला डॉक्टरच्‍या चिठ्ठीची सुद्धा गरज वाटत नाही. मात्र या औषधात वापरण्यात येणारे नॉनस्टेरॉईड अँटी इन्फ्लेमेटरी हे ड्रग्स किडनीवर वेगाने परिणाम करते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचा वापर टाळवाच.
  • जास्त खारट व मीठ असणारे पदार्थ खाण्याचे टाळावे. आवश्यक तेवढ्याच प्रमाणात मीठ खावे.
  • फास्ट फूडमध्ये सोडियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे किडनी खराब होते व हाडांचेही नुकसान होते.
  • साखरेच्या अधिक सेवनाने लठ्ठपणा वाढतो. डायबिटीज, उच्च रक्तदाब हे दोन आजारसुद्धा किडनी डॅमेज करण्यास कारणीभूत ठरतात.
  • दिवसभर एकाच ठिकाणी खुर्चीवर बसणेसुद्धा घातक आहे. त्यामुळे शरीर निष्क्रिय राहते व अशा खराब जीवनशैलाचा किडनीवर विपरीत परिणाम होतो.
  • मटनात ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. अति प्रमाणात मांस सेवन केल्याने ॲसिडोसिस नावाचा आजार होतो. यामुळे माणसाच्या शरीरातून किडनी वेगाने ॲसिड बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे किडनी डॅमेज होण्याचा धोका वाढतो.
  • शरीराचे तापमान संतुलित ठेवावे. योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने किडनीवर परिणाम होतो. पुरेसे पाणी पिल्यावर शरीरातून टॉक्सिन आणि अतिरिक्त सोडियम बाहेर पडते. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. भरपूर पाणी न पिणाऱ्यांना किडनी स्टोनचा धोका अधिक असतो.