Info : तुम्‍ही पुरेशी झोप घेत नाहीत?; मग “या’ गोष्टींसाठी तयार राहा!

बुलडाणा : निरोगी आयुष्य जगण्यासाठी पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. सात ते आठ तास झोप झाली असेल तर दिवस चांगला जातो. मात्र नोकरीमुळे, कामाच्या ताणामुळे जर पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अपुऱ्या झोपेची समस्या दीर्घकाळ असेल तर नैराश्य, उच्च रक्तदाब, हृदय विकार अशा अतिगंभीर आजारांचा सामना करावा …
 

बुलडाणा : निरोगी आयुष्य जगण्यासाठी पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. सात ते आठ तास झोप झाली असेल तर दिवस चांगला जातो. मात्र नोकरीमुळे, कामाच्या ताणामुळे जर पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अपुऱ्या झोपेची समस्या दीर्घकाळ असेल तर नैराश्य, उच्च रक्तदाब, हृदय विकार अशा अतिगंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

२४ तासांपैकी ७ ते ८ तास झोप होत असेल तर रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. मात्र पुरेशी झोप होत नसेल तर त्याचा रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. शरीरातील अँटिबॉडीजवर परिणाम झाल्याने घरबसल्या अनेक आजार चालून येतात. याशिवाय पुरेशी झोप होत नसल्यास तुमच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. शारीरिक संबंध निरस होतात. त्यामुळे गर्भधारणा होण्यास विलंब होऊ शकतो. कामावरून घरी आल्यानंतर जेवण आणि लगेच झोप यामुळे पचन क्रियेस बाधा होते. अपुऱ्या झोपेने तणाव वाढून वजन अनियंत्रित होते. याशिवाय उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतात. हृदयविकार तसेच मधुमेहाचा धोका वाढतो. पुरेशी झोप न झाल्याने चिडचिड तसेच कंटाळा येतो. त्यामुळे नैराश्य, चिंता वाढते. अनियमित झोपेमुळे शरीरातील मेलाटोनिन या मूड नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सला फटका बसतो. त्यामुळे सतत उदास व कंटाळवाणे वाटते. अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्तीवरसुद्धा विपरीत परिणाम होतात. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी किमान ८ तास झोप हवीच.