Info : तुम्‍हाला माहितेय तुमचे नशीब तुम्हाला साथ का देत नाही?

अनेकदा आयुष्यात खूप काही करूनही अपयश येते. नशीब साथ देत नाही, अशी अनेकांची भावना असते. व्यक्तीच्या कुंडलीशी नवग्रहांचा थेट संबंध असतो असं ज्योतिषी सांगतात. ज्योतिष शास्त्रानुसार नशीब प्रतिकूल असेल तर व्यक्तीला आयुष्यात खूप कठीण परिस्थितीतून जावे लागते. अनेकदा प्रयत्न करूनही त्याला मेहनतीचे फळ मिळत नाही. त्याची आर्थिक स्थिती बिघडते. व्यवहारात, नातेसंबंधात, प्रेमसंबंधात अनेक अडथळे येतात. …
 

अनेकदा आयुष्यात खूप काही करूनही अपयश येते. नशीब साथ देत नाही, अशी अनेकांची भावना असते. व्यक्तीच्या कुंडलीशी नवग्रहांचा थेट संबंध असतो असं ज्योतिषी सांगतात. ज्योतिष शास्त्रानुसार नशीब प्रतिकूल असेल तर व्यक्तीला आयुष्यात खूप कठीण परिस्थितीतून जावे लागते. अनेकदा प्रयत्न करूनही त्याला मेहनतीचे फळ मिळत नाही. त्याची आर्थिक स्थिती बिघडते. व्यवहारात, नातेसंबंधात, प्रेमसंबंधात अनेक अडथळे येतात. अर्थात या समस्येवर ज्योतिष शास्त्रानुसार उपायसुद्धा आहेत. त्या उपायांचा अवलंब केल्यास नशीब नक्कीच बदलते, असं ज्योतिषांचे मत आहे.

  • कुंडलीत सूर्य भाग्यवान होण्यासाठी रोज उगवत्या सूर्याला पाणी द्यावे व गायत्री मंत्राचा जप करावा.
  • जर बुध कुंडलीत चांगले परिणाम देत नसेल तर मुलांनी उजव्या व मुलींनी डाव्या हातात तांब्याचे ब्रासलेट परिधान करावे. गणपतीची पूजा करावी व गायीला हिरवा चारा खाऊ घालावा.
  • कुंडलीत मंगळ असेल तर मजुरांना मिठाई खाऊ घालावी. मंगळवारी सुंदरकांडचे पारायण करावे.
  • शुक्र कुंडलीत राहून अशुभ परिणाम देत असेल तर शुक्रवारी तांदळाचे दान करावे. सौभाग्य वाढविण्यासाठी महिलांनी लक्ष्मीमातेची पूजा करावी.
  • जर भाग्येश शनि कुंडलीत कमकुवत असेल तर त्याला मजबूत बनविण्यासाठी काळे आणि निळ्या रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. हनुमानाची रोज पूजा केली पाहिजे. यासोबतच शनिवारी हनुमान चालीसा पठण करावी व दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.