INFO पती पत्नीच्या वयात किती अंतर असावे? चाणक्य सांगतात...
Jul 25, 2024, 11:40 IST
पती आणि पत्नी म्हणजे संसाररथाची दोन चाके. संसाराचा आनंद तेव्हाच असतो जेव्हा पती आणि पत्नी दोघेही एकमेकांना समजून आणि सांभाळून घेतात. दोघांच्या नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो.. नाते हे विश्वासावरच टिकते..पती आणि पत्नीच्या वयात किती अंतर असावे,किती नसावे याबद्दल आर्य चाणक्य यांनी लिहून ठेवले आहे.
चाणक्यनीति या ग्रंथात आर्य चाणक्य अनेक महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्यात. समाजकारण, राजकारण, शिक्षण, कुटुंब व्यवस्था या विषयांवर आर्य चाणक्य यांनी नोंदवले विचार आजच्या युगातही काळसुसंगत आहेत.
पती पत्नीच्या वयातील अंतर दुरावा वाढवू शकतो. शारीरिक इच्छांच्या पूर्ततेसाठी दोघांच्या वयात अधिक अंतर नसावे. एखाद्या वृध्द किंवा उतारवयाकडे झुकलेल्या पुरुषाशी लग्न झाल्यास ती दुसऱ्या तरुणाकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. शारीरिक इच्छांच्या बरोबरच एकमेकांचा आदर आणि सन्मान राखण्यातही वय हा महत्वाचा मुद्दा असतो. वयात अधिक फरक असल्यास नातेसंबंध बिघडू शकतात असे चाणक्य नीतीत म्हटले आहे. डॉक्टर देखील पती पत्नीच्या नात्यात अधिक अंतर नसावे असा सल्ला देतात. पती पत्नीत ५ - ७ वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावे.