"या" महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ! पहा कोण आहेत अपात्र...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाळी अधिवेशनातील माहिती सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. निवडणुका तोंडावर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर केल्याचा विरोधकांचा आरोप होत असला तरी सामान्य लोकांमधून या अर्थसंकल्पाचे स्वागत होताना दिसत आहे. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" ही घोषणा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. काल,१ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही ते आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    कुणाला मिळणार नाही लाभ? 
  • - ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे अशा कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  • - ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • - ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • - ज्या महिला याआधीच शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत महिन्याला १५०० किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
  •  - खासदार आमदार किंवा माजी खासदार आमदारांच्या कुटुंबातील महिला या योजनेस पात्र नाहीत.
  • - ज्यांच्या कुटुंबाची संयुक्तपणे ५ एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • - ज्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहने ( ट्रॅक्टर अपवाद वगळता) आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.