आश्चर्य ; राजे लखोजीराव जाधव समाधी समोरील उत्खननात आढळले महादेवाचे मंदिर! सिंदखेडराजा वासियांची मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी..
May 20, 2024, 12:13 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीतील राजे लखोजीराजे जाधव यांचे समाधी समोरील जागेत केंद्रीय पुरातत्व खात्याकडून बगीचा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या उत्खननात, चक्क महादेवाचे मंदिर आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
राजे लखोजीराव जाधव यांची समाधी जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी म्हणून प्रसिद्ध आहे. समाधीची इमारत भविष्यात अनेक वर्ष टिकून राहावी तसेच पूर्वी जशाप्रकारे या समाधीची भव्यता व सुंदरता होती. त्याच प्रकारे या समाधीला बनविण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने काम सुरू झाले. समाधी परिसरात फरशी बसवून बगीचा तयार करण्याचे काम सुरू असताना उत्खननामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आढळले. हे मंदिर आढळल्यानंतर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूर यांनी सांगितले की, महादेवाचे पिंड आणि शिवलिंग अति प्राचीन आहे. अजून या ठिकाणी उत्खननादरम्यान काय काय पाहायला मिळते याचा शोध घेण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ बोलावणार आहोत.