माझी लाडकी बहीण योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत दाखल झाले "एवढे" अर्ज! लाडक्या बहिणींचा ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन वर भर!वाचा कोणत्या तालुक्यातून किती अर्ज आले...
Jul 19, 2024, 20:54 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कर्ज करण्यात सुरवात झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आज, १९ जुलै पर्यंत पर्यंत १ लाख १० हजार अर्ज दाखल करण्यात आले आहे. यात ७० हजार ऑफलाईन, तर ४० हजार अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपर्यंत १ लाख १० हजार ७७९ महिलांनी अर्ज दाखल केले आहे. यात ७० हजार १० महिलांनी ऑफलाईन, तर ४० हजार ७६९ महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्यात ४ लाख ९७ हजार ६५१ संभाव्य पात्र महिला आहेत.
बुलडाणा तालुक्यात ११ हजार २६४ अर्जामध्ये ऑफलाईन ९ हजार २९९ तर ऑनलाइन १ हजार ९६५, चिखली तालुक्यात १० हजार ५१३ अर्जामध्ये ऑफलाईन ७ हजार ७०८, ऑनलाइन २ हजार ८०५, देऊळगाव राजा तालुक्यात ११ हजार १३० अर्जामध्ये ऑफलाईन ८ हजार ४२६, ऑनलाइन २ हजार ७०४, सिंदखेड राजा तालुक्यात ६ हजार ३९ अर्जामध्ये ऑफलाईन ३ हजार ३९६ , ऑनलाइन २ हजार ६४३, लोणार तालुक्यात ९ हजार ६५८अर्जामध्ये ऑफलाईन ४ हजार ८६२, ऑनलाइन ४ हजार ७९६, मेहकर तालुक्यात १७ हजार १७० अर्जामध्ये ऑफलाईन १० हजार ७५६, ऑनलाइन ६ हजार ४१४, मोताळा तालुक्यात ६ हजार ६८४ अर्जामध्ये ऑफलाईन २ हजार ७२३, ऑनलाइन ३ हजार ९६१, मलकापूर तालुक्यात ६हजार ४०३ अर्जामध्ये ऑफलाईन ४ हजार ७०३, ऑनलाइन १ हजार ७००, नांदुरा तालुक्यात ६ हजार २३१ अर्जामध्ये ऑफलाईन ३ हजार ९०९, ऑनलाइन २ हजार ३२२, शेगाव तालुक्यात ३ हजार ८८९ अर्जामध्ये ऑफलाईन २ हजार ९५, ऑनलाइन १ हजार ७६४, खामगाव तालुक्यात ७ हजार ९३२ अर्जामध्ये ऑफलाईन ५हजार २४६, ऑनलाइन २ हजार ६८६, जळगाव जामोद तालुक्यात ५ हजार ९५० अर्जामध्ये ऑफलाईन २ हजार ७२१, ऑनलाइन ३ हजार २२९, संग्रामपूर तालुक्यात ७ हजार ९१६ अर्जामध्ये ऑफलाईन ४ हजार १६६, ऑनलाइन ३ हजार ७५० अर्ज दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदार महिला स्वत: मोबाईल ॲपवरून अर्ज सादर करू शकतील. तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करू शकतील. तसेच सेतू, सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रमध्येही विनामुल्य अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. महिलांनी या सेवांचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत.
महिलांच्या थेट बँक खात्यात १ हजार ५०० रूपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अर्जामध्ये बँकेचा तपशिल अचूक भरावा. तसेच अर्ज करण्याची सुविधा विनामुल्य असल्याने सुविधा केंद्रचालकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम महिलांकडून घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.