"आवार"च्या पपई उत्पादक शेतकऱ्याचे ८ लाखांचे नुकसान! लागवडी साठी केलेला खर्चही निघेना!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जाते की काय अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात झाली आहे. 
यातच पपई उत्पादन शेतकरी श्रीराम विठ्ठल गावंडे (६०) रा.आवार यांनी आपल्या शेतात दोन एक्कर पपई लागवड केली होती. चांगली मशागत करून पपईच्या झाडाला चांगले फळही लागले होते. मात्र ऐन पपई पिकायच्या मोसमात सततच्या पावसाने पपईच्या झाडांचे पाने पिवळी होवून झाडे कोसळू लागली आहेत. गावंडे यांनी जवळपास १ हजार ५०० झाडे आपल्या शेतात वाढविली होती.त्याला १ लाख ७० हजार खर्चही केला होता. मात्र सततच्या पावसाने पपई पिकाचे नुकसान होवून लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. गावंडे यांचे जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असे त्यांनी बुलडाणा लाइव्ह'शी बोलताना सांगितले.