प्रज्ञा शोध परीक्षेत ओमचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव! पुणे येथील फिजिक्सवाला विद्यापीठात सत्कार

 
 बुलढाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) देशातील प्रतिष्ठित आणि अत्यंत आव्हानात्मक असलेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत रायपूर येथील मूळ रहिवासी तथा पुणे येथे वास्तव्यास असलेला ओम अनिल सिरसाट याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या घवघवीत यशाबद्दल ओमचा १ ऑक्टोबर रोजी पुणे येथील फिजिक्सवाला विद्यापीठात सत्कार करण्यात आला.
हे यश मिळवून ओम सिरसाटने रायपूरवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. यशवंत, कीर्तीवंत, गुणवंत असलेल्या ओमचे सर्वत्र कौतूक होत आहे.
बालपणापासूनच ओम याने विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे. इयत्ता दुसरीमध्ये असताना त्याने ॲबॅकसमध्ये राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला होता. आतापर्यंत त्याने शालेय स्तरावर झालेल्या स्कॉलरशिप, मॅथेमटिक्स व सायन्स ऑलिम्पियाडमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली. तो पश्चिम भारतात पहिला आणि दुसरा आला. त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, एनएमएमएस या परीक्षाही त्याने यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या.
गुरुकुल शिक्षणपद्धतीसाठी महाराष्ट्रातून एकट्याची निवड झाली आहे. यामध्ये त्याला उच्चस्तरीय शिक्षण मिळत आहे. सुरुवतीपासूनच मुलांना शालेय शिक्षणासोबत स्पर्धात्मक परीक्षेला बसवले तर मुले यशाचे शिखर चढतच जातील, हे ओमच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासातून स्पष्ट झाले आहे. तसा संदेशच त्याने मुलांना दिला आहे.
आई, वडिलांसह प्रा. प्राचार्य गव्हले, प्राचार्य ठोंबरे, प्राचार्य मराठे, प्रा. अजयसिंह चौहान, रणजित, मोहित यादव, प्रा. विनायकराव लोखंडे, काकडे, कुहिरे, कीर्ती मॅडम, भालके मॅडम यांचे त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.