NATIONAL NEWS दोघींच्या इश्काचा अंत झाला वाईट;प्रेमासाठी लिंगबदल करून बाईचा माणूस झाला! पण लग्नास नकार दिल्याने प्रेयसीला टाकले जाळून..
Dec 26, 2023, 11:01 IST
चेन्नई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क):तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका ट्रान्ससेक्शुअल युवकाने आपल्या सॉफ्टवेअर इंजिनीयर मैत्रिणीला जिवंत जाळल्याची भयंकर घटना घडली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक करत न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पण मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने त्याने तिची - जिवंत जाळून हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, आरोपीने मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. ट्रान्स पुरुष असलेल्या आरोपीची ओळख वेट्रिमारन अशी पटवण्यात आली आहे. लिंगबदल करण्यापूर्वी तिचे नाव पंडी महेश्वरी असे होते. पंडी महेश्वरी व पीडित आर. नंदिनी या शालेय मैत्रिणी होत्या. पण वाढत्या वयाबरोबर महेश्वरीचा नंदिनीवर जीव जडला. पुढे दोघींनी नोकरीसाठी चेन्नईमध्ये दाखल होत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम सुरू केले.
नंतर महेश्वरीने नंदिनीसोबत लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. आपले नैसर्गिक स्त्रीत्व सोडून महेश्वरी पुरुष झाली. सोबत आपले नावदेखील बदलून वेद्रिमारन असे करून घेतले. परंतु यानंतर २५ वर्षीय नंदिनीने विवाह करण्यास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या वेट्रिमारनने नंदिनीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तिची निघृण हत्या केली. भेटवस्तू देण्याच्या नावाखाली नंदिनीचे डोळे पट्टीने बांधून नंतर तिला साखळीने बांधले. यानंतर तिला पेटवून देण्याचा भयंकर प्रकार वेट्रिमारन याने केला.
२५ वर्षीय पीडित नंदिनी आपल्या नातेवाईकासोबत राहत होती. महेश्वरीने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील नंदिनीने मानवीय आधारावर तिच्यासोबत आपली मैत्री कायम ठेवली होती, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे...