EXCLUSIVE रविकांत तुपकरांच्या आरोपांनी खळबळ..! म्हणाले, माझे फोन टॅप होत आहेत..... सरकारकडून नजरकैदेत ठेवल्यासारखी वागणुक, शेतकऱ्यांना मदत करण्याएवजी निवडणुका जिंकण्यावर लाेकप्रतिनिधींचे लक्ष;

 देशात सध्या अघोषित आणीबाणी असल्याचाही दावा..
 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरकारच्या रडारवर आम्ही नेहमीच असताे. आमचे फाेन टॅप केले केले जातात. आम्ही कुणाशी बाेलताे,हे सुद्धा सरकारला माहीती असते. आमची रेकी केली जाते, पाेलीस आमच्या मागावर असतात.. त्यामुळे नजरकैदेत ठेवल्यासारखी वागणुक आम्हाला देण्यात येते, असा गंभीर आराेप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बाेलताना केला. त्यांच्या या आराेपामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
अकाेल्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी सरकारवर ताेफ डागली हाेती. त्यानंतर २२ सप्टेंबर राेजी एका वृत्त वाहिनीशी बाेलताना त्यांनी सरकारवर गंभीर आराेप करून पुन्हा ताेफ डागली. सरकारकडून हाेत असलेल्या फाेन टॅपींग व इतर बाबींविषयी आम्हाला नाेटीफिकेशन येतात असा दावाही रविकांत तुपकर यांनी केला आहे.तसेच आपण आपल्या वक्तव्यावर अजुनही ठाम असल्याचे ते म्हणाले. नेपाळमध्ये जसे मंत्र्यांना सर्वसामान्य नागरिकांनी तुडु तुडु हाणलं, तसेच  जर शेतकऱ्यांना मदत केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरीही मंत्र्यांना तुडु तुडु हाणणार असे तुपकर यांनी सांगितले. 

बुलढाणा तालुक्यासह जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने शेतकरी उद्धस्त झाला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत करण्याएवजी लाेकप्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या पक्षांच्या जागा जास्त निवडूण आल्या पाहीजे यासाठी मेळावे घेत आहेत. आज शेतकऱ्यांना तुम्ही मदत देत नाहीत, कर्जमाफीचे आश्वासन देता पण ते पूर्ण करीत नाहीत, साेयाबीन, कापसाला भाव नाही, हा असंताेष कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर येणारच आहे असा दावाही रविकांत तुपकर यांनी केला. नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली तर नवल वाटायला नकाे, त्यात काय चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. 

देशात सध्या अघाेषीत आणीबाणी

देशात १९७५ मध्ये घाेषीत आणीबाणी हाेती. सध्या अघाेषीत आणीबाणी सुरू आहे.आम्हाला तुरुंगात टाकणार, आमच्यावर कितीही कारवाई केली तरी शेतकऱ्यांची बाजु घेवू. जेव्हा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद सुरू असताे. तेव्हा कुणीतरी युगुपुरुष जन्माला येत असताे. काेणत्यातरी मार्गाने हा असंताेष बाहेर पडत असताे. महाराष्ट्रातही असा असंताेष बाहेर पडणार आहे. ताे काेणत्या मार्गाने बाहेर पडणार हे सांगू शकत नाही. पण शेतकऱ्यांचा असंताेष बाहेर उफाळून येईल आणि नेपाळ सारखी परिस्थिती देशात आणि महाराष्ट्रात येइल असे आपले आकलन असल्याचेही यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.