EXCLUSIVE जिल्हा परिषदेच्या लफडेबाज अधिकाऱ्याची दुसरी गोष्ट! दोन "कलेक्ट–कर"! कारनामे भयंकर...
Sep 11, 2025, 12:31 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा परिषद सध्या विविध कारणांमुळे तुफान चर्चेत आहे. प्रशासक राज असल्याने बिनधास्त झालेल्या अधिकाऱ्यांची खाबुगिरी वाढली आहे. कुणी लफडे बाजी करण्यात गुंतला आहे.."हे" आमचे व्यक्तिगत आयुष्य आहे असे म्हणत लफडेबाज अधिकारी नैतिकता धाब्यावर बसवतो आहे, हे मानसिक "आरोग्य" बिघडल्याचेच लक्षण नाही का? तर असो..तुम्हाला मानसिक "आरोग्य" बिघडलेल्या या लफडेबाज अधिकाऱ्याची आणखी एक दुसरी गोष्ट आम्ही सांगतो.. याआधीची अपार्टमेंटमधील गोष्ट आता बहुतेकांच्या कानापर्यंत पोहोचली आहे. लफडेबाजीच्या प्रकरणातूनच "या" अधिकाऱ्याला एका तरुणीसह तिघांनी बेदम धुतले होते. जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी असलेल्या या अधिकाऱ्याला लफडेबाजीचा छंद लागला तो अमर्यादित माया जमल्यामुळेच. "लक्ष्मीदर्शन" झाल्याशिवाय हा अधिकारी कोणतेच आणि कुणाचेच काम करत नाही. विशेष म्हणजे दर्शन घडवून आणण्यासाठी या अधिकाऱ्याने "दोन" स्पेशल लोकांची नियुक्ती केली आहे. "त्या" दोघांच्या माध्यमातूनच लक्ष्मी त्याच्यापर्यंत पोहोचते,अर्थात या लक्ष्मीदर्शनातून ते स्वतःवरही कृपा करून घेतात म्हणा...
या लफडेबाज अधिकाऱ्याचे ते दोघे एक प्रकारे "कलेक्ट–कर"च आहेत. स्वतःच्या "करांनी" करण्यात अडचण असल्याने त्या दोघांच्या करांनी करेक्ट कार्यक्रम करून घ्यायचा अन् नंतर जे मिळाले ते स्वतःच्या करात घ्यायचे असा या लफडेबाज अधिकाऱ्याचा माया जमवण्याचा धंदा सुरू आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यालयातून चालणाऱ्या जवळपास सगळ्यात बाबी "लक्ष्मी–दर्शनातूनच" होत असल्याने समाजाचेही "आरोग्य" धोक्यात आले आहे.
या अधिकाऱ्याच्या "कलेक्ट– करांपैकी" एक असलेला याआधी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात होता. त्यानंतर सध्या असलेला टेबल मिळवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत मोजली होती म्हणत्यात.त्यामुळे कुणाचेही काम मोजल्यावरच झाले पाहिजे असा एक दंडकच या अधिकाऱ्याच्या कार्यालयात लागू झाला आहे. या अधिकाऱ्याला "पवार" .. अरे सॉरी "पॉवर" देणारा आणि उन्हाळा, पावसाळा अन् "हिवाळ्या"तही "उब" देणारा, असे दोघे त्यांचे काम चोख बजावतात. त्यामुळे दर महिन्याला पगाराच्या दहा वीस पट माया हा अधिकारी जमवतो आणि लोकांच्या तळतळाटातून जमवलेली ही माया लफड्यांवर उधळतो..