बुलडाणेकरांना स्वरविहार च्या कार्यक्रमाची सांस्कृतिक मेजवानी 

व्हाॅईस ऑफ मीडिया आणि बुलडाणा अर्बन चा संयुक्त उपक्रम ...
हास्यजत्रा फेम गौरव मोरे आणि वनिता खरात खास आकर्षण
 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) व्हाॅईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशातील सर्वात मोठ्या संघटनेच्या वतीने बुलढाणा मध्ये पत्रकार कल्याण निधीसाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी (दि. २५) करण्यात आले आहे.
समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात. त्यामध्ये आर्थिक स्वरूपाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वार्ध्याक्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे पत्रकार कल्याण निधीचा विचार पुढे येऊन व्हॉइस ऑफ मीडिया व बुलडाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरविहार या रंगारंग कार्यक्रमाची सांस्कृतिक मेजवानी बुलडाणेकरांना मिळणार आहे. 
येथील सहकार विद्या मंदिराच्या भव्य सभागृहात २५ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
हास्यजत्रा फेम गौरव मोरे, वनिता खरात, मराठमोळी नृत्यांगना स्वाती धोकटे , अतुल कुलकर्णी व ग्रुप यांचा नृत्याविष्कार याशिवाय प्राध्यापक राजेश सरकटे यांचा स्वरविहार हा मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रमासाठी रंगारंग कार्यक्रमांमध्ये समावेश आहे. 
मुख्यगायक प्रा. राजेश सरकटे, सरला शिंदे, प्राची माडीवाले यांची चमू राहणार आहे. विजय मिमरोट, दिलावर अली, संजय आठवले, अंकुश बोर्डे, अमित निर्मळ, बाबा खंडागळे, कृष्णा चेन्ने, अभिजीत शिंदे हे वाद्यवृंद म्हणून साथ देणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिकेसाठी व्हाट्सअप मीडियाचे कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ 8698474062 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.