बुलडाणा लाइव्ह.. चिखली तालुका प्रतिनिधी म्हणून पुन्हा ऋषी भोपळे यांच्यावर जबाबदारी ! खामगाव तालुका प्रतिनिधी म्हणून भागवत राऊत यांची फेरनियुक्ती...
Dec 12, 2024, 11:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डिजिटल मीडियात क्रांतीचे पाऊल ठरलेल्या "बुलडाणा लाइव्ह" ची लोकप्रियता आता उत्तुंग शिखरावर पोहचली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात आता वाचकांची पहिली पसंती बुलडाणा लाइव्ह बनले आहे. जगभरातील बुलडाणेकर देखील "बुलडाणा लाइव्ह" च्या माध्यमातून मायभूमीशी कनेक्ट राहत आहेत. जिल्हाभरात पसरलेले प्रतिनिधींचे नेटवर्क आणि जनतेच्या हिताप्रती असलेली प्रामाणिक तळमळ यामुळेच बुलडाणा लाइव्ह घराघरात पोहचले आहे.दरम्यान आता २०२५ साठी नव्याने प्रतिनिधींची नियुक्ती लाइव्ह ग्रुप कडून करण्यात येत आहे. यात चिखली आणि खामगाव तालुक्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. चिखली तालुका प्रतिनिधी म्हणून ऋषी भोपळे तर खामगाव तालुका प्रतिनिधी म्हणून भागवत राऊत यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. लाइव्ह ग्रुप महाराष्ट्राचे मुख्य संचालक श्री अशोक थोरात, सौ.वैष्णवी राजपूत, समूह सल्लागार कृष्णा सपकाळ यांनी ही नियुक्ती केली आहे. चिखली तालुका प्रतिनिधी म्हणून ऋषी भोपळे व खामगाव तालुका प्रतिनिधी म्हणून भागवत राऊत यांची गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता व्यवस्थापनाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.ऋषी भोपळे हे चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील तर भागवत राऊत खामगाव तालुक्यातील पातोंडा पेंडका येथील राहणारे आहेत.नव्या नियुक्तीमुळे बुलडाणा लाइव्ह च्या दोन्ही शिलेदारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..